महाराष्ट्रातील पुण्यात एका डॉक्टरने आपल्या संपूर्ण कुटुंबाची हत्या करून गळफास लावून घेतला. शहरापासून ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या वरवंड गावात ही हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून पशुवैद्यकीय डॉक्टर अतुल दिवेकर याने पत्नीचा गळा आवळून खून केला. यानंतर दोन मुलांना विहिरीत टाकून त्यांचाही जीव घेतला. तिघांची हत्या केल्यानंतर डॉक्टरने घरी जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली.
मात्र, हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. त्याचबरोबर विहिरीत फेकलेल्या मुलांना शोधण्याचे कामही सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल दिवेकर, पल्लवी दिवेकर, आदिवत दिवेकर, वेदांती दिवेकर अशी मृतांची नावे आहेत. अतुल दिवेकर हे पशुवैद्यकीय डॉक्टर होते आणि त्यांच्या पत्नी शिक्षिका होत्या.
किरकोळ वादातून दोघांमध्ये भांडण झाले होते, त्यानंतर अतुल दिवेकर याने एवढं भयंकर पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. पत्नीसोबतच्या भांडणामुळे अतुलला काळजी वाटायची. मंगळवारी पुन्हा एकदा भांडण झाले असता रागाच्या भरात अतुलने पत्नी पल्लवीचा गळा आवळून खून केला.
Latest News