WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मराठी अभिनेत्री राधिका देशपांडे हिने सैफ अली खानच्या ‘आदिपुरुष’मधील भूमिकेची तुलना बालकलाकाराशी करत, “आमचा समीर…”

रामायणावर आधारित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट रिलीज झाल्यापासूनच वादात सापडला आहे. ‘आदिपुरुष’ या बहुचर्चित चित्रपटाला त्याच्या संवाद VFX मुळे ट्रोल केले जात आहे. तसेच या चित्रपटातील रावणाचा लूकही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला नाही. ‘आदिपुरुष’ चित्रपटातील मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यासंदर्भात एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने केलेली पोस्ट चर्चेत आहे.

मराठी अभिनेत्री राधिका देशपांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. राधिका अनेक मुद्द्यांवर पोस्टच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसत आहे. सध्या ती तिच्या मुलांच्या ‘सियावर रामचंद्र की जय’ या नाटकाच्या प्रयोगात व्यस्त आहे. राधिकाने सैफ अली खानच्या ‘आदिपुरुष’मधील रावणाची तुलना तिच्या मुलांच्या नाटकातील रावणाशी केली आहे. तिने इंस्टाग्रामवर दोघांचा फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे.

रावणाच्या भूमिकेत समीर गुमास्ते आणि ‘आदिपुरुष’मधील सैफ अली खान या फोटोत आहेत. या दोघांमध्ये वयाबरोबरच मोठे अंतर आहे. आमचा समीर रावणाच्या रुपात पाहण्यासाठी VFX ची गरज नाही. गरज आहे ती करोडो प्रेक्षकांच्या उपस्थितीची. मुलांचे ‘सियावर रामचंद्र की जय’ हे नाटक नक्की बघा,” असे राधिकाने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Latest News

Leave a Comment