MHADA News : लोकप्रतिनिधी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना म्हाडाचा दणका; 11 टक्के घरांची तरतूद रद्द
मुंबई : लोकप्रतिनिधी, राज्य सरकारी कर्मचारी तसेच केंद्र सरकारी कर्मचारी आणि म्हाडाच्या कर्मचाऱ्यांसाठी म्हाडाच्या गृहप्रकल्पांमधील आरक्षणे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे सर्व कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी अल्पसंख्याक गटातील नसल्याने म्हाडाने 11 टक्के आरक्षण रद्द करून तृतीय श्रेणीतील व्यक्ती, अत्याचारित महिला आणि असंघटित कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील प्रस्ताव म्हाडाच्या मुंबई महामंडळाने राज्य सरकारकडे पाठवला आहे. … Read more